उस्मानाबाद/ प्रतिनिधी  

  मंगरूळ बीट मधील शिष्यवृत्ती पात्र व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सन 2018 -19 पासून बीटमध्ये िशन स्कॉलरशिप हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत वर्षभरात 20 सराव चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी दर महा एक चाचणी शाळास्तरावर व एक चाचणी बीट स्तरावर घेण्यात आली होती. शाळा स्तरावर सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बीटस्तरीय चाचणीसाठी प्रवेश देण्यात येत असे. बीटस्तरीय चाचणी झाल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले होते. या सर्व सराव चाचण्या साठी कोणत्याही प्रकारच्या रेडीमेड प्रश्नसंच याचा वापर न करता बीट स्तरीय शिक्षकांच्या कार्यबल गटाकडून प्रश्नपत्रिकांची निर्मिती करण्यात येत असे. दरमहा घेण्यात आलेल्या बीटस्तरीय चाचणी मधील सर्वोत्कृष्ट गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात येत असे.  सर्व शाळांना बीटस्तरीय विशेष उपक्रम निधीतून प्रसिद्ध प्रकाशनाचे प्रश्न संच उपलब्ध करुन देण्यात आले होते. 

बीट मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी माहे फेब्रुवारी 2020 मध्ये तीन दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रमाणे बीट मधील शिष्यवृत्ती पात्र व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी बीटस्तरावर  सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मध्ये मागील वर्षी पेक्षा पात्र विद्यार्थ्यांची संख्या 211 टक्के वाढली आहे; तर आठवी शिष्यवृत्ती मध्ये 141 टक्के वाढली आहे. 2018 मध्ये पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची संख्या फक्त 30 होती. मागील वर्षी त्याच्या मध्ये किंचित वाढ होऊन ती 36 झाली; तर चालू वर्षी त्याच्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ होऊन ती 76 झाली आहे.2018 मध्ये आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची संख्या फक्त 9 होती. मागील वर्षी ती 12 झाली; तर चालू वर्षी त्यामध्ये वाढ होऊन ती 17 पर्यंत पोहोचली आहे. याप्रमाणे चालूवर्षी बीट मधील पात्र विद्यार्थ्यांची एकूण संख्या 93 झाली आहे.  

 निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवून निकालाची टक्केवारी वाढवण्यापेक्षा पटसंख्येच्या प्रमाणात जास्त विद्यार्थी पात्र करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी (अा) या शाळेने चालू वर्षी आठ पैकी आठ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवले..  सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. याप्रमाणे पटसंख्येच्या प्रमाणात शंभर टक्के निकाल असणारी ती जिल्ह्यातील बहुदा पहिली शाळा असावी..    याच प्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्री,जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा मंगरूळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा ताड आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वाडी या शाळेचा निकाल अत्यंत समाधानकारक आहे.. खाजगी माध्यमिक शाळेचा विचार केला तर इंदिरा माध्यमिक शाळा मंगरूळ या शाळेचा निकाल समाधानकारक आहे... त्यामानाने बीट जिल्हा परिषद माध्यमिक शाळांचा प्रतिसाद  कमी दिसून आला...  विद्यार्थी निहाय निकालाचे अवलोकन केले असता एकूण नऊ  विद्यार्थ्यांना एका पेपर मध्ये चांगले गुण असतानाही दुसऱ्या पेपरमध्ये केवळ एक प्रश्न चुकल्याने अपात्र झाल्याचे दिसून येत आहे.. अशा विद्यार्थ्यांचे बाबतीत पेपर फेरतपासणी साठी अर्ज करण्यात येणार आहेत.. फेरतपासणी मध्ये किमान एक उत्तर बरोबर आले तर बीट मधील पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी मंगरूळ बिटने पुढाकार घेतला. त्याला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देवून गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षा 100% कॉपी मुक्त वातावरणात पार पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहेत तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी काम करणाऱ्या अनेक उत्कृष्ट शिक्षकांनी मंगरूळ बीटचे याबाबत आभार मानले आहे.

 शिष्यवृत्ती परीक्षेतील मंगरूळ बीट च्या यशाबद्दल राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, शिक्षणाधिकारी रामलिंग काळे इत्यादी मान्यवरांनी मंगरूळ बीटचे  शिक्षण विस्तार अधिकारी, दोन्ही केंद्रप्रमुख व बीट मधील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष पोस्ट टाकून जाहीर अभिनंदन केले आहे


 
Top