उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील दोन तलावाच्या मधोमध असलेल्या गावांमध्ये तलावाचे पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. तर घरामध्ये पाच ते सहा फूट पाणी असल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तर यामुळे अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत. पाचुंदा तलाव व हंगरगा तलाव या दोन्ही तलावाच्या मधोमध असलेल्या हंगरगा (तुळ) या गावात ओव्हर फ्लो झालेल्या तलावांचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम अद्याप पर्यंत झालेल्या असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.