तुळजापूर / प्रतिनिधी -  

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञोत्सव यंदा कोरोना पार्श्वभूमीवर आल्याने कोरोनाचा शिरकाव तिर्थक्षेञ तुळजापूरात होवू  नये यासाठी भाविक व त्यांची वाहने शहरात प्रवैश करु नये यासाठी  तीन स्तरीय बँरेकेटींग लावली जात असुन ही बँरेकेटींग लावताना शहरवासियांना कमीतकमी ञास व भाविकांची वाहने शहरात येवु अशा पध्दतीने पोलिस खात्याचा सुचने नुसार शहरासह परिसरात बँरेकेटींग लावण्याच्या कामास आरंभ झाला आहे.

यंदा श्रीतुळजाभवानी मातेचे शारदीयनवराञोत्सव भाविका विना साजरे होत असले तरी भाविकांनी शहरात वाहनांन मधुन येवु नये अशा पध्दतीची बँरेकेटींग लावली जात आहे.व जागोजागी चेक पाँईट तयार केले जात आहेत

शहरात भवानी रोड छञपती शिवाजी महाराज चौक कमान वेस पावणारा गणपती चौक बसस्थानक जवळील विश्वनाथ काँर्नर येथे मंदीराकडे येणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या भागात लाकडी बँरेकेटींग लावले असुन यंदा भाविक नसल्याने मोठ्या प्रमाणात बँरेकेटींग लावले जात नाहीत.या बँरेकेटींग बरोबरच चेक पोस्ट ही येथे तयार केले जात आहे .तसेच तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविक व त्यांचे वाहने प्रवेश करु नये यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूरच्या हद्दीवर असणाऱ्या सोलोपूर बार्शी रस्त्यावर   बार्शी टी पाँईट नळदुर्ग रोडवरील हंगरगा तुळ येथे लातूर रोडवरील काक्रंबा येथील बायपास व उस्मानाबाद रोडवरील बायपास व मोर्डा येथे बँरेकेटींग व चेक पाँईट तयार केले जात आहेत. यंदा बायपास रस्ते झाल्याने जवळपास साठ टक्के वाहतुक शहरातुन जावु शकणार नाही.

 प्रशासनाला सहकार्य करा !

भाविकांनी कोरोना पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने घरातच थांबुन आँनलईन दर्शन घेवुन घरीच शारदीयनवराञोत्सव साजरा करावा जर भाविक मोठ्या संखेने आले कोरोना संसर्ग वाढुन मंदीर खुले करण्यासाठी आणखी ऐक दोन महिने जादा लागण्याची शक्यता असल्याने भाविकांनी प्रशाषणाला सहकार्य करुन घरीच शारदीयनवराञोत्सव साजरा करावा असे आवाहन प्रशाषणाने केले आहे.


 
Top