उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील एका १० वर्षीय बालिकेवर तीन अल्पवयीन नराधमांनी सामुहिक बलात्कार केला आहे. सदरील पीडितेची प्रकृती सुधारत असून सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

तातडीच्या बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना पोलिस अधिक्षक रोशन यांनी सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकिल नियुक्त करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून माहिती घेतली गेली आहे. माझे लक्ष  पीडितेवर असून उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी उमरगा, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबळ पुरावे जमा झाले असले तरी, जास्तीत-जास्त सबळ पुरावे, जमा करून न्यायालयात दोन दिवसात दोषारोपत्र दाखल करणार आहे. पीडितेचा परिवार आर्थिकदृष्टया कमजोर असल्याने या परिवाराला मदत करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावेळी गुन्हा दाखल करण्यास उशिर का झाला या संदर्भात पत्रकारांनी विचारल्यानंतर पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिचा जीव वाचविणे आवश्यक होते. त्यानंतर प्राथमिक चौकशी पुलिस विभागामार्फत करण्यात आली. या संदर्भातील पुरावे गोळा करण्याचे काम ही यावेळी करण्यात आले. त्यानंतर घटनेच्या दोन दिवसानंतर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी एलसीबीचे दग्गु भाई शेख यांची उपस्थिती होती. 

 
Top