उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जिल्हयात लॉकडाऊनचा कालावधी दि.31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला असून लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
संदर्भिय क्र.2 च्या आदेशाचे परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्र.4 (K) मध्ये दर रविवारी जनता कर्फ्यु राहील असे नमूद केलेले आहे.ज्याअर्थी संदर्भ क्र.3 मध्ये नमूद विनंतीचे अनुषंगाने संदर्भ क्र.2 च्या आदेशात अंशत: दुरुसती करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी निर्देश दिले आहेत.
संदर्भिय क्र.2च्या आदेशातील परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्र. 4 (K) मध्ये नमुद केलेले दर रविवारी जनता कर्फ्यु राहील हे वाक्य याद्वारे वगळण्यात येत असून यापुढे रविवारचा जनता कर्फ्यु या आदेशाद्वारे मागे घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देशांनुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.