तालुक्यातील दाबका येथे स्माईल फाउंडेशनच्या सहकार्याने क्रांतिकारी महिला सामाजिक संस्था दापका यांच्या वतीने गरजू २५० कुटुंबीयांना किरण गायकवाड यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले.
सचिव बालिकाताई इंगळे यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड, पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, परमेश्वर साखरे , माजी सरपंच अंबादास इंगळे, प्रा. माधवराव माने , पोलीस पाटील प्रशांत पाटील, प्रा. शौकत पटेल, माजी सरपंच व्यंकटराव पाटील, बाळासाहेब माने आदी मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
कोरोणा काळात व पावसाच्या अतिवृष्टीमुळे मदतीचा हात म्हणून अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबल्याने सर्वसामान्य, गरजू, कामगार, शेतकरी, शेतमजूर कुटुंबांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, आटा, तेल,साखर,डाळ, रवा, साबण, बटाटे, कांदे, मिरची पावडर, हळद, हरभरा, मीठ, चहा पावडर, मास्क, सॅनीटायझर आदी वस्तूंचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीकारी संस्थेचे अध्यक्ष अर्पिता इंगळे ,वनिताताई गायकवाड ,अंगद इंगळे ,राहुल पवार, हिराजी पवार ,सुरेखा गायकवाड , छाया पवार, गजेंद्र इंगळे, अतुल भोसले, सुनील जाधव, कृष्णा माने आदींनी परिश्रम घेतले.