तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यात  गेली  पंधरा दिवसांपासून धुवादार पाऊस बरसल्याने  शेतात पाणी साचले गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उघड  दिल्याने  परिसरातील शेतकऱ्यांनी  सोयाबीन काढुन ते खळे करण्यासाठी चक्क रस्ते व बायपास रस्त्यावर आणुन ढीग रचले असल्याने चक्क आता खळे रस्त्यावर आहेत असतानाचे दृश्य पहावयास मिळत आहे.सध्या रस्त्यावर काढलेल्या सोयाबीनचे ढीग रचणे वाळवणे व रस्त्यावर भरडणे व पुन्हा रस्त्यावरच वाळवुन मग आडतीला सोयाबीन घेऊन जात असतानाचे पहावयास मिळत आहे.

 तुळजापूर तालुक्यात मागील दहा ते पंधरा दिवसापासुन पावसाची संततधार चालु होती नुकतीच दोन दिवसापासून पावसाने उघड दिल्याने शेतातील पाण्यातुन सोयाबीन काढणीसाठी लगबग सुरू झाली आहे.शेतात सर्वञ ओल असल्याने काढलेले सोयाबीन ठेवायाचे कुठे असा प्रश्न पडल्याने संकटाशी दोन हात करुन  त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातील काढलेले सोयाबीन  बायपास रस्त्यावर आणुन त्याचे ढीग रचले असुन  पावासापासुन संरक्षण होण्यासाठी  ताडपञी अंथरुन पाऊस पडला तर काढलेले सोयाबीन भिजू नये याची परिपुर्ण दक्षता घेत आहे.दररोज काढलेले सोयाबीन डोक्यावरून रस्त्यावर आणुन ढीग रचत आहे हे वाळल्यानंतर रस्त्यावरच  सोयाबीन खळे करत आहेत.   त्यामुळे सध्या ग्रामीण भागातील रस्त्यावर शेतात  सोयाबीन काढणीचे ढीग पहावयास मिळत आहे. 


 
Top