उस्मानाबाद/ प्रतिनिधी
केंद्र सरकार ने प्रचंड विरोधानंतर ही शेतकरी व कामगार विरोधी विधेयके मंजूर करून हूकूमशाही पध्दतीने जनतेचा आवाज दाबण्याचा प्रकार केला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ दि. २८ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शहर काँग्रेसच्या वतीने जनजागृती व स्वाक्षरी राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास अप्पा शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यासाठी शेतकरी, कामगार व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले आहे.