उस्मानाबाद/ प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात जिल्हयातील पानटपऱ्या बंद असल्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस पुर्णपणे बंदी करण्यात आली होती, त्यामुळे शौकींनांची गोची झाल्याने त्यांना छुप्या मार्गाने तंबाखू खरेदी करून आपली हौस पूर्ण करावी लागत होती. त्यासाठी त्यांना १० पटीने पैसे खर्च करण्याची वेळ आली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील पानटपरी उघडण्याबरोबरच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास परवानगी दिली असली तरी सावर्जनिक िठकाणी थुंकण्यास सक्त मनायी करण्यात आलेली आहे.

कोरोनाचे संकट जिल्हयावर मोठ्या प्रमाणात घोगावत असल्याने पानटपरीच्या िठकाणी अनेक नागरिकांची गर्दी होण्याबरोबरच तंबाखू व पान खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. या थूंकीच्या थेंबाद्वारे कोरोना विषाणूंचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्यामुळे संपूर्ण पानटपऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र ती बंदी उठविल्यामुळे शौकींना ना एक प्रकारे अंत्यानंद झाला आहे. 


 
Top