उस्मानाबाद / प्रतिनिधी -

थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उस्मानाबाद येथे काँग्रेसच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या शुभहस्ते सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, पं.स.सभापती शिवाजीराव गायकवाड, प्रशांत पाटील, आशिष मोदाणी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, जावेद काझी, शहाजी मुंडे सर, धनंजय राऊत,  सलमान शेख, राजाभाऊ नळेगावकर, राजेश शिंदे, अवधूत शिरसागर, देवानंद एडके, गोरोबा झेंडे, राजू स्वामी, अब्दुल लतिफ, मोईज शेख, सुभाष हिंगमिरे, मिलिंद गोवर्धन, अनंत घोगरे, राहुल लोखंडे, कृष्णा तवले, प्रसन्न कथले, इलियास खान, मेहबूब खान, सौरव गायकवाड, प्रेम सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top