तंबाखू सेवनामुळे कॅन्सर सारखा दुर्धर व जीवघेणा आजार होत असल्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे पाळणे काळाची गरज आहे त्यासाठीच कुटुंब तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे राज्य तंबाखू नियंत्रण प्रकल्प अधिकारी डॉ. आकाश कासलीकर यांनी केले.
येथील समर्थ हॉलमध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष उस्मानाबाद व रणवीर अहिल्या बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी सामाजिक संस्थेसाठी एक दिवशीय तंबाखू नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन दि.३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी कासलीकर बोलत होते. यावेळी उस्मानाबाद जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा समुपदेशक विक्रांत राठोड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, दत्तात्रय गायके, नितीन वाकळे व गणेश उगले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ कासलीकर म्हणाले की, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये युवकांची मोठी संख्या असून दररोज ८० लाख युवक या व्यसनाच्या आहारी जात असल्याने व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण २८.६ टक्के म्हणजेच २६.६० लाख आहे. तर महाराष्ट्रामध्ये २६.६० लाख संख्या असून मृत्यूचे प्रमाण ३.४ कोटी तर महाराष्ट्रात २ लाख असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोरूना पॉझिटिव झालेल्या रुग्णांचे रिकवरी प्रमाण १४.६ टक्के आहे. मात्र कॅन्सरची लागण झालेल्या रुग्णांचा शेवट हा मृत्यूनेच होत असल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. तंबाखू सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, छातीचा व गर्भाशयाचा देखील कॅन्सर होत असल्यामुळेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे जेवण करणे कटाक्षाने तळणे आवश्यक असून ते तळण्यासाठी मनाचा दृढनिश्चय आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी बोलताना विक्रांत राठोड म्हणाले की, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असून सिगारेटमध्ये ४ हजार केमिकल घातक स्वरूपाची असून त्यापैकी ६५ केमिकल्समुळे १०० टक्के कॅन्सरची लागण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
उस्मानाबाद जिल्ह्यात ३२० शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून आठ ठिकाणी तंबाखूमुक्ती चे समुपदेशन केंद्र सुरू आहेत. त्यामुळे तंबाखू सोडण्यासाठी व्यायाम योग प्राणायम करणे आवश्यक असून तंबाखू मुक्त गाव, तालुका व जिल्हा करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्नाची काष्टा करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी रंगनाथ जोशी, नितीन वाकळे, राम जवान व समाधान ढेरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यशाळेत तंबाखूमुळे होणारे तोटे या बरोबरच आरोग्यावर होणारे विपरीत घातक परिणाम व ते टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागीगी झालेल्या संस्था प्रतिनिधींना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन त्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले.