उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेती पिकासाठी एकरी ४ हजार तर फळपिकासाठी एकरी १०हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली आहे १० हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी यात कृषी, शेती व घरांच्या नुकसानीपोटी केवळ साडेपाच हजार कोटीची मदत देणार असल्याचे सांगण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनसह अन्य खरीप पिके, ऊस व फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे नुकसानीच्या तुलनेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे एकरी ३० ते ५० हजार रूपायांचे नुकसान झाले आहे मग शेतकरी ४ हजार रुपायात काय करणार? त्यामुळे शेतकरी संतापला आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान नुकसानीच्या रक्कमे इतकीतरी मदत द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी माहिती 


मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिली

 
Top