उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

प्रहार अपंग क्रांति आंदोलन उस्मानाबादच्या वतीने  मौजे केशेगाव ता.जि उस्मानाबाद येथे 95 व्या शाखेचे उदघाटन  प्रसिद्ध उद्योगपती सुरेश पडवळ  यांच्या हस्ते व संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या प्रमुख उपस्थित झाले .

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटिल हे उपस्थित होते. यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी मंजूर शेख,उपाध्यक्षपदी दीपक गवळी तसेच सचिवपदी हनुमंत फरंडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना देवीदास खंडागळे यांनी केली  उद्घाटन कार्यक्रमास  रामेश्वर सुरवसे, मेहबूब शेख,जाबुवंत वाघमारे,फयाजली शेख,धनंजय देशमुख,शिवदास कोळगे,मारुती देशमुख,भारत शिंदे,महादेव कदम,केवळ गवळी, शिल्पा गवळी, चंद्रकांत खंडागळे, भामाबाई शिंदे, चिंगुबाई जाधव,दत्ता सातपुते,पांडुरंग काळे, रामेश्वर सपाटे, आदिल शेख, भरतरी जाधव, गुणवंत नवले,माणिक देशमुख, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 
Top