राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघ यांच्यावतीने दि. 29, रोजी केंद्र व राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा आणि नवीन कामगार कायद्याचा निषेध नोंदविण्यात आला. जुनी पेन्शन लागू करावी, महागाई भत्त्याची रक्कम दिवाळीपर्यंत देण्यात यावी, बक्षी समितीचा खंड 2 तात्काळ प्रसिद्ध करावा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट कराव्यात, सर्व विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ नियमित कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आले
या वेळी दिलेल्या निवेदनात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे संघटनेचे श्री चंद्रकांत शिंदे, बालाजी पांचाळ, आयुब शेख, यशवंत डोलारे, महसूल कर्मचारी संघटनेचे श्री माधव मैदपवाड, प्रमोद चंदनशिवे, शीतल माजलगावकर, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे श्री आकुसकर व नागटिळक एन डी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.