संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष,
गोविंद पाटील / प्रतिनिधी-
जिल्हयात  सर्वच अस्थापन एकाच दिवशी बंद ठेवण्याच्या अनुषंगाने जनता कर्फ्यू  शनिवार ऐवजी रविवारी करण्याची मागणी होत होती. त्यास प्रतिसाद देत  जिल्हाधिकारी दिवेगांवकर यांनी शनिवार ऐवजी रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले आहेत . परंतू हा जनता कर्फ्यूचा  आदेशाचे  तालुक्यातील बेंबळी गावात कांही दुकानदारांनकडून उल्लंघन होत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रविवारी दि. ६ सप्टेंबर रोजी कांही दुकानदारांनी व पानपट्टी धारकांनी तसेच टी-स्टॉल उघडल्याने गर्दी पहावयास मिळत होती.त्यातच कांही दुकानदारांमध्ये त्यांच उघड आहे तर मग आम्ही काय घोड मारल की काय ? संबंधित प्रशासन मात्र  ठराविक दुकानदारांवर कारवाई करत आहे, अशा प्रकारची कुजबुज ऐकावयास मिळाली.
पुर्व जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी पदाचे सूत्र जिल्हाधिकारी दिवेगांवकर यांनी संभाळताच त्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीस प्रतिसाद देत शनिवार ऐवजी रविवारी जनता क‌‌र्फ्यू लागू करण्याचे आदेश देऊन व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा कांही अंशी प्रयत्न केला.   पूर्वी प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले होते. परंतु, या दिवशी व्यावसायिक अस्थापना बंद राहिल्या तरी शासकीय कार्यालये, बँका व इतर संस्था सुरूच रहात असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कायम होती. त्यामुळे सर्वच अस्थापन एकाच दिवशी बंद ठेवण्याच्या अनुषंगाने जनता कर्फ्यू रविवारी करण्याची मागणी होत होती. नूतन जिल्हाधिकारी यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत यापुढे जनता कर्फ्यु प्रत्येक रविवारी राहिल असे जाहीर केले आहे. परंतू या आदेशाचे बेंबळीत संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उल्लंघन होत आहे.याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 
Top