परंडा / प्रतिनिधी :-
दि. 5 सप्टेंबर 2020 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा व संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकाच्या आदेशान्वये ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयामध्ये डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, कनिष्ठ वरिष्ठ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमधून उच्च पदावर कार्यरत असलेले विद्यार्थी यावेळी झूम ॲप द्वारे सदर कार्यक्रमास सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा.डॉ.अतुल हुंबे, प्रा डॉ संभाजी गाते, प्रा डॉ अरुण खर्डे, प्रा.डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, प्रा.डॉ.गजेंद्र रंदिल, प्रा.डॉ.सचिन चव्हाण,ग्रंथपाल विभागप्रमूख प्रा.डॉ .राहुल देशमुख यांच्यासह कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व सोशल डिस्टंसिंग चे पालन करत उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी शिवाजी गायकवाड तसेच याच महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा माजी विद्यार्थी दीपक हुके, प्रा.तानाजी फरतडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी शिक्षक दिनानिमित्त सांगितले की ,प्रत्येक शिक्षक हा विद्वान नव्हे तर आदर्श शिक्षक असला पाहिजे.त्यांचे विद्यार्थ्यावर प्रभाव दिसले पाहिजेत ,शिक्षक हा विद्यार्थ्यांना दैवत मानणारा असावा तो सतत प्रसन्न असला पाहिजे. त्याची मार्गदर्शकाची भूमिका असली पाहिजे. त्याने ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे व विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहिले पाहिजे तर तो खरा आदर्श शिक्षक म्हणता येईल.देशाचे भवितव्य हे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार शिक्षकांनी दिले पाहिजे अशी त्यांनी सांगितले .यावेळी फिलीपाईन्स येथील डॉ. डॉक्टरीन यांनी सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयात covid-19 चे पालन करत मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा.शंकर अंकुश यांनी मानले.