उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात विविध ठिकाणी २१ बेकायदा दारू विक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी छापे मारले. यामध्ये ४४ हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
कारवाईत गावठी दारू निर्मितीचा १८०० लिटर द्रवपदार्थ नष्ट केला. १८८ लिटर गावठी दारु, देशी दारुच्या २२४ बाटल्या, विदेशी दारुच्या २३ बाटल्या जप्त केल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मितीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रित किंमत ४० हजार आहे. यावरुन २१ व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलिस ठाण्यात २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भूम, वालवड, पिंपळा, आलुर, मुरळी, कास्ती (बु.), खेड, जुना बस डेपा, पापनास नगर (उस्मानाबाद), कळंब, मोहा, चिलवडी, भानसगाव, येरमाळा, कडकनाथवाडी, माणकेश्वर, शिंगोली, बामणी आदी गावात कारवाई करण्यात आली.

 
Top