उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 लोहारा शहरातील घरफोडीतील आरोपीला चार महिन्यानंतर गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
लोहारा येथील प्रकाश तुकाराम राठोड यांच्य घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने दि.२१ मे रोजी मध्यरात्री घरातील कपाटातील १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह शाओमी कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेला होता. राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही नोंद झाला.
या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पांडुरंग माने, हेकॉ प्रमोद थोरात, पोना हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने घरफोडीच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. यावेळी त्यांनी गुन्हा करणाऱ्या संशयीत व सराईत आरोपींकडे तपासाची दिशा वळवली. यातुन हा गुन्हा बेंबळी येथील अमोल शंकर माने (२३) याने केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावरून पथकाने दि.१२ सप्टेंबर रोजी अमोल माने यास बेंबळी येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीस त्याने “तो मी नव्हेच’ अशी भुमीका घेतली. परंतु, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून चोरीतील शाओमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला असुन त्यास लोहारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच घरफोडीतील दागिन्यांची कोठे विल्हेवाट लावली याचा तपास लोहारा पोलिस करत आहेत.
 
Top