तुळजापुर / प्रतिनिधी-  

तिर्थक्षेञ तुळजापूरात वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेला आठ दिवसाचा जनता कर्फ्यु आज पासुन शिथील करण्यात आल्याची घोषणा व्यापारी नगरसेवक पञकार शहरवासिय यांच्या सोमवार दि. 28 रोजी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले.

तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना चा वाढता प्रार्दुभाव पार्श्वभूमीवर व नवराञोत्सव पुर्वी कोरोना आटोक्यात यावा या उद्देशाने   नगरपरिषदेने वतीने दि.२३ ते ३०सप्टेबर या आठ दिवसाचा कालावधीत  जनता कर्फ्यु चे आयोजन केले होते व त्यास शहरवासियांनी उस्फुर्त पणे प्रतिसाद दिला होता माञ व्यापारी वर्गाचा मागणी वरुन सोमवार दि28रोजी व्यापारी वर्गाशी होवुन यात  बैठक चालु असताना  आ राणाजगजितसिंहपाटील यांना मोबाईल वरुन संपर्क साधुन  व्यापारी वर्गाचे म्हणने ऐकुण घेतल्यानंतर  आ राणाजगजितसिंहपाटील यांच्या मध्यस्ती नंतर मंगळवार पासुन जनता कर्फ्यु शिथील करण्याचा निर्णय घेवुन व्यापारी वर्गाला दिला दिला.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष सचिन रोचकरी म्हणाले कि शहरवासियांचा जीवासाठी आम्ही जनता कर्फ्यु चा कठोर निर्णय घेतला यास शहरवासियांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने मीशहरवासियांचे मना पासुन आभार मानतो. जनता कर्फ्यु मुळे  कोरोना साथीच्या रोगाचा पादुर्भाव कमी झाला आता  मंगळवार दि.२९ रोजी पासुन शहरातील जनता कर्फ्यु शिथील करण्यात येत आहे  शहरातील  सर्व दुकाने ९ ते ५ या वेळेत चालु राहतील असे स्पष्ट केले.

यापुढे . नगर परिषदेच्या वतीने या पुढे शहरात” नो मास्क, नो एन्ट्री” ही मोहीम राबविण्यात येणार आहे. संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे या पुढे शहरातील नागरीकांना तोडांला मास्क लावने बंधनकारक राहणार आहे.शहरात नागरीकांनी बाजार पेठांन मध्ये  वावरताना  शोषल डिस्टंन्स ।  पाळावे.प्रत्येक नागरीकांनी आप आपली जवाबदारी   काटेकोर पणे पालन केले तरच आपण कोरोनावर मात करु.माझेकुंटुबमाझीजबाबदारी हे ही संकल्पना घरोघरी राबवा असे आवाहन यावेळी केले.

आपल्या जीवासाठी  मुख्याधिकारी नगराध्यक्ष,नगरसेवक न.प.कर्मचारी अहोराञ परिश्रम घेत आहेत त्यांना सहकार्य करा, येणाऱ्या शारदीय नवराञ महोत्सवा दरम्यान  राज्य शासन जो निर्णय देईल त्याचे नगरपरिषद पालन करेल असे यावेळी सांगितले .

या बैठकीस मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी ही मार्गदर्शन केले. सदरील बैठकीस न.प.अधिक्षक वैभव पाठक नगरसेवक  पंडितराव जगदाळे रणजीत इंगळे ,सुनील रोचकरी विशाल रोचकरी विनोद गंगणे नानासाहेब लोंढे माऊली भोसले राहुल खपले विनोद पलंगे आदीसह नगरसेवक शहरातील व्यापारी नागरीक न.प.कर्मचारी उपस्थित होते.

 
Top