परंडा
/प्रतिनिधी : -परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाच्या भराव भिंतीस भगदाड पडले असून हे भगदाड सुमारे पाचशे ते सहाशे फूट पडले आहे.ग्रामस्तांच्या निर्दशनास आल्याने हा प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्प सप्टेंबर अखेरच्या महिन्यात पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने पूर्ण क्षमतेने भरून सांडव्या वरून पाणी वाहत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आसताना काही शेतकरी दि.28 सोमवार रोजी धरणावर गेले असता त्यांना भराव मातीच्या भिंतीला मोठे भरदाड पडल्याचे दिसूनआल्याने गावातील ग्रामस्तानी संबंधीत खात्याच्या कर्मचाऱ्यांना वरिल बाबीची माहिती दिली.तसेच येथील तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना ही माहिती देण्यात आली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच आमदार सजितसिंह ठाकूर यांनी वरिल बाबीचे गांभीर्य पाहून जलसंपदाचे अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क करून खबरदारी व उपाय योजना बाबत बोलल्याची माहिती दिली आहे.