उमरगा/ प्रतिनिधी

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढयातील पहिला हुतात्मा गुंजोटी गावचे सुपुत्र हुतात्मा वेदप्रकास यांना उजाळा देण्यासाठी ग्रामपंचायत व समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी  (दि. २५) रोजी हुतात्मा वेदप्रकास स्मृतिस्तंभाचे भुमिपुजन स्वातंत्र्य सैनिक भगवान पुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे ऑनलाइन उदघाटक महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. यावेळी मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एम ए सुलतान होते. अध्यक्ष म्हणुन श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ दामोदर पतंगे हे होते.

गुंजोटी गाव हे निजामशाही यांच्या राजवटीत पायग्याचे व जिल्ह्याचे  ठिकाण होते.मराठवाडा मुक्तीसंग्रामात गुंजोटी येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. यामध्ये पुरुषा बरोबरच महिलांचा समावेश आहे. 

मराठवाडा मुक्ती संग्रामात गुंजोटी गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी व पहिला हुतात्मा आर्य वेदप्रकास हरके यांनी दिलेल्या बलिदाना तेजोमय इतिहास व लढा देताना प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्याचे स्मृति टिकून राहावे ह्या हेतुने गुंजोटी ग्रामपंचायत व नियोजन समितीच्या वतीने गुंजोटी येथे हुतात्मा वेदप्रकास स्मृतिस्तंभ उभारन्यात येत आहे.

या भूमीपुजनासाठी गुंजोटीचे सरपंच सौ सुशिलाबाई विश्वनाथ देशमुख, उपसरपंच शिवाजी गायकवाड, माजी सैनिक शेषेराव सूर्यवंशी, माजी सैनिक प्रसाद हत्तीकाळे, गुंजोटी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बलभीम शाईवाले, सचिव बालाजी पोतदार, पोलिस पाटील नाजेर देशमुख, व्यापारी संघटनेचे आर्यभुषन रंगदळ, गुंजोटी कृषी मंडळाचे नागेश रामदासी, विश्वनाथ देशमुख, डॉ संजीवन गायकवाड, सुरेश सूर्यवंशी, पंदु शिंदे, योगेश शिंदे, नाना शिंदे, पिंटु साखरे, ग्रामविकास अधिकारी जी डी हालबर्गे, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे सुनील पाटील,

विजय स्वामी, संतोष सूर्यवंशी, सतीश माळगे, रमेश माळगे, रणवीर चव्हाण, नितिन साळुंके, रविंद्र देशमुख, महेश देशमुख, दिलीप चौगुले, शिवकुमार देशमुख, पद्माकर शाईवाले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. हुतात्मा वेदप्रकास स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी माजी उपसरपंच राजेंद्र गायकवाड, सिद्राम देशमुख, चंद्रशेखर कदेरे, अनिल सूर्यवंशी, स्वप्निल देशमुख, संजय शिवनेचारी, शाम देशमुख आदिनी परिश्रम घेतले.

 
Top