परंडा / प्रतिनिधी
आरक्षीत जागेत शासकीय कार्यालय व निवास्थान साठी असलेली खुली जागा असल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन शासणाची  फसवणुक केल्या प्रकरणी परंडा नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्या विरूध्द  परंडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेने एकच खळबळ उडाली आहे.
सदरील प्रकरणाबाबत पोलिस सुत्रा कडून  मिळालेली माहिती अशी की नगर परिषदेचे कर्मचारी महेश रतन कसबे व बादेश इब्राहीम मुजावर,रा.परंडा या दोघाने दि.6.8.2020 रोजी पर्यंत संगणमताने बनावट दस्तऐवज बनवून शासनाने गव्हर्नमेंट ऑफीस व स्टाफ क्वार्टरसाठी आरक्षीत केलेली होती.परंडा नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्र. 234 ‘ब’ मधील 10 आर जमीन खुली जागा असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन शासनाची फसवणुक केल्या बद्दल येथील नगरपरिषद मधील लिपीक रणजित काशीद यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम फिर्यादी वरून भा.दं.सं.कलम- 420, 465, 466, 471,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक इकबाल सय्यद यांच्या मार्ग दर्शना खाली स.पो.निरिक्षक सासणे हे करित आहेत.
 
Top