तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्टस् प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी शासनाचे देणे थकवल्याने व गैरप्रकार केल्याने शासनाने कारवाई करीत या कंपनीला लिलावात काढले होते. त्यानुसार सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजता राबविलेल्या लिलाव प्रक्रियेस कोणीच बोली न लावल्याने ही प्रक्रिया गुंडाळावी लागली. शासनाच्या पुढील आदेशानुसार लिलाव प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे तहसीलदार यांनी यावेळी जाहीर केले.
वैष्णोदेवी फूड कंपनीच्या संचालकानी शासनाचे जवळपास पस्तीस कोटी रुपये थकविल्याने दहा महिन्यापूर्वी कंपनीच्या संचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर शासनाने या कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करून रक्कम वसुलीसाठी सोमवारी जाहीर लिलाव प्रक्रीया तुळजापूर तहसीलदर सैदागर तांदळे यांनी सुरू केली. परंतु, लिलावात कोणीही बोली लावण्यासाठी पुढे न आल्याने ही प्रक्रिया स्थगित करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. लिलाव प्रक्रियेच्या सुरूवातीला दूध संघ, दुग्ध उत्पादक शेतकरी अश्या विविध लोकांचे कंपनीकडून येणे असणाऱ्यांचे २५ जणांचे कंपनीविरुद्ध तक्रारी अर्ज आले. त्यानंतर लिलावात भाग घेण्यासाठी आलेल्या व्यक्ती, समुह, संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले. यासाठी तीस मिनिटांचा वेळ देण्यात आला. यावेळेत एकही अर्ज आला नाही. त्यामुळे पुढील आदेशाने लिलावाची तारीख जाहीर केली जाईल असे जाहीर केले.