उस्मानाबाद/ प्रतिनिधी
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढणारे महाराष्ट्रातील पहिले आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सांर्वजनिक सभागृहांमध्ये अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देऊळकर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 16 फेब्रुवारी 1831 मध्ये इंग्रजी सत्तेच्या विरोधात राजे उमाजी नाईक यांनी सर्वप्रथम जाहीरनामा प्रसिद्ध करून क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. या स्मृतिप्रीत्यर्थ राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली जाते. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, भांडार विभागातील भंडार विभागातील मधुकर कांबळे यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.