उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 तुळजापूर तालुक्यातील डिकमल पारधी वस्ती येथे राहणाऱ्या युवकाला चोरीच्या दुचाकीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
तुळजापूर ते बेंबळी रस्त्यावरच्या डिकमल वस्तीवर राहणारा चिवचिव्या जयराम भोसले उर्फ सागर (२१) चोरीची दुचाकी वापरत होता. याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, सहाय्यक पोलिस फौजदार मधुकर घायाळ, तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोलिस नाईक समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने डिकमल पारधी वस्ती येथुन भोसलेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघकीस येण्याची शक्यता आहे.

 
Top