तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथे इयत्ता पहिली ते चौथी तील 314 विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिका वाटप सरपंच वर्षाराणी बंडगर, यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री अशोक कंदले, ग्रामपंचायत सदस्य  काका बंडगर,  उमेश पांडागळे, उमेश खांडेकर,  शिव कुंभर साबळे,  मल्लिनाथ काळे,  सतीश हुंडेकरी , शिवमुर्ती स्वामी, धनंजय मुळे, कुंभार अदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबुराव चव्हाण यांनी केले. लॉकडाउनच्या काळामध्ये  प्रत्येक विद्यार्थी मोबाईलवर अभ्यास करतोच असे नाही तेव्हा स्वाध्याय पुस्तिकेचा  उपयोग विद्यार्थ्यांना चांगला होईल तसेच शाळेचा सर्व मुलांना मोफत स्वाध्याय पुस्तिका वाटपाच्या स्तुत्य उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान गावचे सरपंच वर्षाताई बंडगर यांच्यातर्फे प्रत्येक मुलाला लेखन साहित्य एक पेन वाटप करण्यात आला . तसेच उमेश पांडागळे ,अशोक कंदले यांच्यातर्फे पहिली दुसरीच्या मुलांना स्पेशल लेखन साहित्य वाटप करण्यात आले .

 यावेळी शाळेतील शिक्षक वृंद मंदा भड, माया पवार, दीपाली परदेशी, संजीवनी सरवदे, अश्विनी जोगदंड, महानंदा अल्मेलकर ,वर्षा पाठक ,जयश्री चव्हाण ,छगन जगदाळे ,राहुल गायकवाड ,जगन्नाथ वाघे, शाळेतील सेविका अनिता शिरसागर उपस्थित होते. पालकांनी व विद्यार्थ्यांनी योग्य अंतर ठेवून मास्क वापरून कार्यक्रम यशस्वी केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सुर्वे यांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव चव्हाण यांनी केले.

 
Top