उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील नागरिकांमध्ये कोरोना या महामारीबद्दल जनजागृती व्हावी तसेच लोकांची कुठल्याच बाबतीत गैरसोय होवू नये यासाठी उस्मानाबाद नगरपरिषद विविध उपाययोजना करतच आहे. याच अनुषंगाने पोलीस प्रशासन उस्मानाबाद व (ग्रीनी द ग्रेट, पुणे) एक ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस मुख्यालयात असणाऱ्या अलंकार हॉल ह्या ठिकाणी सदरील कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मोतीचंद  राठोड  व प्रमुख पाहुणे श्री. हरिकल्याण येलगट्टे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कार्यक्रमाची रूपरेषा व कोविड 19 विषयी थोडक्यात मार्गदर्शन हे नगरपरिषदेचे सल्लागार श्री. अमोल गायकवाड यांनी केले. तसेच ह्या कार्यक्रमाचे उद्देश व महत्व समजावून सांगण्यात आले.  तसेच नागरिकांच्या मनातील कोरोना बाबतची भीती दूर व्हावी व नागरीकांनी यासंदर्भात काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबतच्या प्रश्नावलीचा या उपक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून स्थानिकांना या आजाराबाबत बेसिक माहिती व उपाययोजना सोप्या भाषेत कळाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच या उपक्रमामुळे नगरपरिषदेला शहरातील नागरिकांचा डेटा बेस उपलब्ध होईल.

या उपक्रमात सदर प्रश्नावली गुगल फॉर्म च्या सहाय्याने एका लिंक द्वारे उस्मानाबाद शहरातील नागरिकांना whatsapp वर उपलब्ध करून देणे शक्य होईल. या लिंक वर क्लिक करून नागरिकांनी त्यांचे नाव, इ- मेल व फोन नंबर टाकून प्रश्नावलितील प्रश्नाच्या योग्य पर्यायासमोर फक्त क्लिक करायचे आहे. या प्रश्नांनंतर कोरोना फायटर म्हणून एक शपथ येईल, ती शपथ वाचून त्यावर क्लिक केल्यावर न.पा. तर्फे autometic एक प्रमाणपत्र त्यांच्या इ-मेल वर पाठविले जाईल.

● कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी उस्मानाबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. हरिकल्याण येलगट्टे यांनी पोलीस प्रशासन उस्मानाबाद शहरात करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानले. मुख्यधिकारी यांनी उस्मानाबाद नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी शहरातील नागरिकांना देत असलेल्या सेवे विषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच उपस्थित पोलीस बांधवांना त्यांनी आवाहन केले की, कोविड संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले किंवा कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली तर ते न लपवता त्वरित डॉक्टरांच्या सल्याने औषध उपचार करून घ्या. 24 नंबर शाळा, रामनगर ह्या ठिकाणी कोविड अँटीजन सेंटर सुरू केले आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.


 
Top