उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर नंदकिशोर उर्फ भाऊसाहेब कुंजूलाल भन्साळी (७६) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यानी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात तीन बंधू, एक बहीण, तीन मुले असा परिवार आहे.उस्मानाबाद राजस्थानीं समाजाचे ते मार्गदर्शक होते.ईश्वरीय ब्रह्माकुमारी संस्थेचे ते प्रचारक होते.योग हस्त मुद्राचे ते गाढे अभ्यासक होते.माहेश्वरी सभेचे प्रेदशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, डॉ राधाकिशन भन्साळी व औषधाचे व्यापारी नारायण भन्साळी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. उद्योजक शाम भन्साळी, विजय भन्साळी व संजय भन्साळी यांचे ते वडील होत.अत्यंत प्रतिकूल
परिस्थितीतुन त्यांनी भन्साळी उद्योगाची उभारणी केली. काही काळ ते शासकीय सेवेतही कार्यरत होतें.