उस्मानाबाद / प्रतिनिधी
पावसाअभावी निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य, कोरोना आजाराचा वाढता संसर्ग यामुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक ठिकाणी स्वत:हून भक्तांनी घरच्याघरीच गणेशाचे विसर्जन केले. नगरपालिकेतही दरवर्षीप्रमाणे ११ मूर्तींचे जतन करण्यात आले. कोरोनामुळे दरवर्षीचा झगमगाट कोठेही दिसून आला नाही.
गणेशोत्सवावर यावर्षी कोरोना महामारी तसेच पाण्याच्या दुर्भिक्षाचे सावट होते. पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक जलस्रोत कोरडे पडले आहेत. विहिरी व नद्यांसह प्रकल्पातही पाणी नाही. अशात पीओपींच्या मूर्ती विसर्जित केल्या तर आहे त्या पाण्याचे विसर्जन होण्याची शक्यता होती. अनेक घरांमध्ये नागरिकांनी प्रतिकात्मकरित्या श्रींचे विजर्सन केले. काही गल्लीतील नागरिकांनी एकत्रित येऊन एकाच ठिकाणी मोठ्या भांड्यात पाणी घेऊन गणरायाचे विसर्जन केले. तसेच काही गणेशभक्तांनी नगरपालिकेने चार रथ शहरात फिरवले होते. त्यात विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लावला. स्वत:हून कोणत्यातरी विहिरीत किंवा आडांमध्ये मूर्ती विसर्जित करण्याऐवजी पालिकेच्या चार रथातील कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पालिकेने सुरक्षितपणे गणेशविसर्जन विहिरीत मूर्ती आणून विसर्जित केल्या. पालिकेचे रथ दिवसभर शहरात फिरवण्यात येत होते.
काही गणेशभक्तांनी आपला उत्साह सोडला नाही. कोरोनाचे नियम डावलत थेट हातगाड्यांवर मूर्ती बसवून गटाने आणून विसर्जित केल्या. अनेकांनी हातलाई मंदिराजवळील विहिरीत व तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मात्र, येथे दुपारच्या दरम्यान गर्दी झाली होती. अनेकांनी नेहमीप्रमाणे गुलाल उधळत गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या. एकूणच कोरोनाच्या काळातळी नागरिकांनी आनंदाचा शोध घेत गणेशोत्सव साजरा केला.