उमरगा /प्रतिनिधी
मुरूम येथील यशवंत नगर भागात राहणारे शफी इमडे यांनी दैनिक केसरी, सोलापूर या वर्तमानपत्रात सन 1997 पासून त्यानंतर दै.गावकरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून 12 वर्ष पत्रकार म्हणून सुरवातीला काम केले. त्यानंतर सन 2009 पासून दैनिक सकाळचे मुरूम शहर बातमीदार म्हणून काम करत होते.
शफी इमडे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी कळताच शहरात शोककळा पसरली. ते अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव असल्याने या परीसरात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने मुरूम पत्रकार संघात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो अशी भावना बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी शिवाजी चौकात आयोजित शोकसभेप्रसंगी विविध सामाजिक संस्था, संघटना व मित्रांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजपचे नेते राजू मिणीयार, राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय इंगळे, श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड, मराठा सेवा संघाचे मोहन जाधव, किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भगत माळी, सरकार भिमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.महेश मोटे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी डॉ.सुधीर पंचगल्ले, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, लिंगायत सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष देवराज संगुळगे, माजी उपनगराध्यक्ष संतोष चिलोबा, मराठा सेवा संघाचे श्रीधर इंगळे, मुरूम शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कारभारी, माजी अध्यक्ष महेश निंबरगे, राम डोंगरे, रफिक पटेल, डॉ.सुभाष हुलपल्ले, झाकीर बागवान, रवी अंबुसे, राजेंद्र घोडके, नामदेव भोसले, वैभव शिंदे, किशोर कारभारी, संतोष कांबळे आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून शोकसभा संपन्न झाली.