कळंब / प्रतिनिधी
वाढीव बिल आकारणीमुळे संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळंब शहरातील महावितरणच्या कार्यालयाची मंगळवारी (दि.१) सकाळी तोडफोड करत रोष व्यक्त केला. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी सकाळी कळंब मनसेचे तालुकाप्रमुख सागर बारकुल, शहराध्यक्ष अमोल राऊत, रामेश्वर थोरात व कृष्णा गंभीरे हे कळंबच्या महावितरण कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी वाढीव वीजबिलाबाबत जाब विचारत मोठ्याने घोषणाबाजी करत कार्यालयातील टेबलए खुर्च्या, केबिनच्या काचा, संगणकाचे काच, सीपीयू अादींची ताेडफाेड करून नुकसान केले.याप्रकरणी वरील चाैघांवर कोणतीही पुर्वसूचना न देता तोंडाला मास्क न लावता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून वाढीव वीज बील आकारणी केल्याने त्यांच्यावर गुन्हा नाेंद करण्यात अाला अाहे. यामध्ये कार्यालयाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सदरील चौघांविरोधात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब पोलिसांनी घटनास्थळावरून सदरील आरोपींनां अटक केली आहे. सदरील आरोपींना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.