कळंब / प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार 2019-20 येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक.1 कळंब शाळेला जाहीर झाला आहे.
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून नपा मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री अर्जुन कोळी यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेजा पायाळ(लांडगे) ,सहशिक्षक सर्जे पी. एन, पवळ एस. के ,नथाडे डी. एच. ,बाकले एन. व्ही, पठाण वाय. डब्ल्यू. ,खरडकर ए. ए. ,झाडे एम. एन. या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती, सर्व
पालकवर्ग,मा.मुख्याधिकारी नगर परिषद कळंब,गटशिक्षणाधिकारी कळंब ,अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सर्व नगरसेवक नप कळंब यांच्यामार्फत अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे .
तसेच 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त DIET उस्मानाबाद अंतर्गत वेध यशोगाथा विशेषांकात शाळेची यशोगाथा (लेख) प्रकाशित झाल्याबद्दल सर्व स्तरावरून या उपक्रमशील शाळेचे कौतुक होत आहे.