काटी/ प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील एक सांप्रदायिक क्षेत्रातील एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व तथा सदन शेतकरी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे यांचे वडिल कै.सुखदेव बाबुराव काळे यांचे प्रदिर्घ आजाराने गुरुवार दि. 10 रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. सोमवारी दुपारी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आदींनी केमवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन घरातील वडिलांचे छत्र हरपल्याचे दु:ख न पेलणारे असून आम्ही आपल्या सोबत आहोत, काळजी घ्या असे म्हणत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे यांच्यासह काळे कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला.
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, डॉ. दिपक काळे आदी उपस्थित होते.