उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरात सध्या अॅन्टीजन टेस्ट चे  दोन केंद्र शहराच्या दोन्ही टोकला असून जिल्हा शासकीय रूग्णालयात असलेले कोरोना टेस्ट केंद्राच्या जवळ कोरोना रूग्ण असल्याने कोरोना टेस्ट करण्यासाठी लोकांना भिती व आडचणी येत होत्या. त्यामुळे  कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबालकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करत शहरात मध्यवर्ती ठिकाणी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट चे केंद्र सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या नुसार जिल्हाधिकारी दिवेगांवकर यांनी उस्मानाबाद शहरातील राम नगर येथे न.प.शाळेत अॅन्टीजन टेस्ट चे केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
Covid-19 कोरोना व्हायरस महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी उपायोजनेचा महत्वाचा  एक भाग म्हणजेच नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट झाल्या पाहिजेत हे मा.जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर  यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार श्री.कैलास पाटील, नगराध्यक्ष श्री.मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत   प्राथमिक आरोग्य केंद्र राम नगर शाळा क्रमांक 24 नगरपरिषद  उस्मानाबाद येथे आज दिनांक ७ सप्टेंबर 2020 रोजी पासुन रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात सुरूवात केली आहे.
उस्मानाबाद शहरातील व तालुक्यातील  नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला,  डोकेदुखी इत्यादी लक्षणे असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्याने  सकाळी 10:00 ते दुपारी  03:00 पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर शाळा क्रमांक 24 नगरपरिषद उस्मानाबाद येथे जाऊन आपली रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करून घ्यावी.
नागरिकांना विनंती की, कुठलाही आजार अंगावर न काढता वेळेवर उपचार घेण्यासाठी करण्यात आलेल्या सोयींचा  लाभ घेऊन आपलं शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी नगरपरिषद उस्मानाबाद व प्रशासनास सहकार्य करावे

 
Top