उस्मानाबाद /प्रतिनिधी
माडज ता. उमरगा येथील रहिवाशी तथा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दयानंद काळे (वय 56 ) यांचे रविवारी दि. ६ रोजी पहाटे ४ वाजता मुंबई येथील रूग्णालयात कोरोनाने निधन झाले. ते बेंबळी पोलिस स्टेशन अंतर्गत पाडोळी (अा) येथील दुरक्षेत्र येथे कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनाने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. काळे यांच्या निधनानंतर पोलिस दल व पोलिस पाटलांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.