उस्मानाबाद /प्रतिनिधी
राष्ट्रीय महापुरुषांच्या नावाचा उपयोग करून त्यांचा अपमान करणा-‍या एकता कपुरच्या अल्ट बालाजी या चित्रपट निर्मिती कंपनीवर सरकारने  बंदी घालावी अशी प्रतिक्रिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक व अध्यासन समितीचे सदस्य तथा  पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष  धनंजय तानले  आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, यासंदर्भात  पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही दिली आहे.
ZEE5 या यू ट्यूब चॅनलवरून Vargin Bhaskar नावाच्या वेब सिरीयल मधून दाखवीत असलेल्या LOVE, SEX आणि LAFDE संदर्भातील VDO मध्ये  अहिल्याबाई गर्ल हॉस्टेल च्या नावाचा हाॅस्टेलचे चिञीकरण दाखविला आहे.त्यामुळे  ZEE5  आणि ATAL Balaji या निर्मात्या कंपनीच्या व एकता कपूर यांच्य विरोधात राज्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण केला आहे. त्यामुळे भविष्यात कायदा सुव्यस्थापनाच्या दृष्टीकोणातून जर कांही नुकसान झाले तर त्याला एकताकपूर व त्यांची कंपनी जबाबदार असेल असा इशाराच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक व अध्यासन समितीचे सदस्य तथा  पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी यावेळी दिला. 
 
Top