येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.2 प्राथमिक पदवीधर श्री.चव्हाण रमेश हनुमंत यांची संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
उस्मानाबाद येथील रायगड फंक्शन हॉल येथे कार्यकारणीची बैठक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विभागाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीची कार्यकारणी गठीत करण्यात आली.शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. परंतू सर्वानुमते श्री.रमेश हनुमंत चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.निवडीनंतर संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारणीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी,मा.जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड,दत्ता कवडे,राहुल चोंदे,मराठा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संदिप शेंडगे तसेच कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबददल मुख्याध्यापक मुकुंद नांगरे,प्रशांत सलगरे,नारायण बाकले,तलाठी सिरसेवाड,श्री.चोंदे,सुनिल बोरकर,अनिल जाधवर महादेव सुतार, रामेश्वर बोबडे, दिपक भराटे, किशोर शेंडगे तसेच आदींनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
