उस्मानाबाद / प्रतिनिधी-
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सोलापूर, उस्मानाबाद व लातूर NH-548C टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी स्टेशन तसेच धोत्रे ते येडशी, ढोकी, मुरुड (NH-63) 166 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिल्याचे पत्र मा. सडक परिवहन मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी दि. 12 सप्टेंबर 2020 रोजी पत्राद्वारे कळवले आहे. लातूर-मुरुड-ढोकी-येडशी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग मराठवाडयातून पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबईला दळणवळण करणेकरीता वापरण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्ता होऊन अपघाताने जिवीत व वित्त हानी मोठया प्रमाणावर होत असल्याचे पत्रान्वये मा.मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
खासदार ओमराजे निंबाळकरांनी 4 जुलै 2020 रोजी सडक परिवहन एवंम राजमार्ग मंत्रालयाकडे मतदारसंघातील वरील द्रुतगती मार्गाची दुरावस्था निदर्शनास आणून दिले. दि. 21/11/2019 रोजी लोकसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न क्र. 71 उपस्थित करुन व तसेच मा. नितीनजी गडकरी साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याअनुशंगाने या द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याकरीता दि. 25/09/2020 रोजी या विभागाचे मुख्य अभियंता नवी मुंबई यांनी सदरील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील रस्ते विकासाकरीता 166 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे कळवले आहे.
उस्मानाबाद, लातुर, सोलापूर जिल्हयातील या द्रुतगती मार्गाच्या दुरुस्तीने दळणवळण व वाहतुकीसाठी सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्हयातील नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे.