उस्मानाबाद / प्रतिनिधी -
राज्य शासनाने दि.३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. त्यानुसार जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दि.२ सप्टेंबरपासून जिल्ह्यात नवीन नियमावली लागू केली आहे. यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर इतर दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. तसेच मेडीकल दुकाने २४ तास चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक वस्तुंच्या दुकानांमध्ये दुध, किराणा, भाजी, फळविक्रेते या दुकानांचा समावेश केला आहे तर उर्वरीत इतर दुकानांमध्ये समाविष्ट आहेत. ही सवलत दिलेले असली तरी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे निकष पाळले गेले नाही अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट, दुकाने शासकीय यंत्रणेकडून तत्काळ बंद करण्यात येतील असेही बजावले आहे. तसेच जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू राहतील. तर पोलिस वेल्फेअरचा पेट्रोलपंप चोविस तास सुरू राहिल.
जिल्ह्यातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील. बी बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने व त्या अनुशंगाने इतर आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत चालू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू राहतील.
रेस्टॉरंन्टसमध्ये फक्त स्वयंपायकगृह चालु ठेवुन अन्न पदार्थाची घरपोच सेवा देण्यास सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत परवानगी राहील. राष्ट्रीय महामार्गांवरील व राज्य महामार्गांवरील धाबे २४ तास चालू राहतील. तर पान टपऱ्या मात्र बंदच राहतील.
आता रविवारी जनता कर्फ्यू
पूर्वी प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले होते. परंतु, या दिवशी व्यावसायिक अस्थापना बंद राहिल्या तरी शासकीय कार्यालये, बँका व इतर संस्था सुरूच रहात असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कायम होती. त्यामुळे सर्वच अस्थापन एकाच दिवशी बंद ठेवण्याच्या अनुषंगाने जनता कर्फ्यू रविवारी करण्याची मागणी होत होती. नूतन जिल्हाधिकारी यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत यापुढे जनता कर्फ्यु प्रत्येक रविवारी राहिल असे जाहीर केले आहे. तसेच निवासी सोय असलेले हॉटेल्स व लॉज १०० टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.