उस्मानाबाद / प्रतिनिधी -
जिल्हयात (कोव्हिड -19) या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.2 राम नगर, उस्मानाबाद येथे (कोविड – 19) स्वॅब,अँटीजन टेस्ट तपासणी केंद्र स्थापन करण्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश जारी केले आहे.
वरील तपासणी केंद्रावर मुख्याधिकारीनगर परिषद, उस्मानाबाद यांनी पुरेशा प्रमाणात आरोग्य विषयक कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. सदर तपासणी केद्रांवर सकाळी 09.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत स्वॅब्/ ॲटीजन टेस्ट करण्यात याव्यात. त्याचा दैनंदनि अहवाल CS/DHO यांना सादर करावा. ॲटीजन टेस्ट तपासणी केंद्रावर येणा-या व्यक्तींची थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे व त्यांचे ऑक्सिमीटर रिडींग घेवून त्याचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे.
आरोग्य सचिव महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 21 ऑगस्ट 2020 चे परिपत्रकांतील सुचनांप्रमाणे (SOP प्रमाणे) तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. दैनंदिन तपासणी अहवाल जिल्हा शल्यचिकीत्सक/ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेस सादर करावा. असे आदेशात नमूद केले आहे.