उस्मानाबाद/ प्रतिनिधी
महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम,2015 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी शासकीय,शासन अनुदानित आणि खाजगी विनानुदानित महाविद्यालयांच्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे (एमएचटी-सीईटी-2020 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणार आहे.
या प्रवेश परीक्षा दि.01 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दोन सत्रांमध्ये राज्यांतील 36 जिल्हयांमधील 180 विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.यावर्षी सदर परिक्षेला अंदाजे 5 लाख 41 हजार विद्यार्थी बसणार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता,दि. 01 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात येणा-या एमएचटी-सीईटी 2020 या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सुलभ व्हावे. यादृष्टने उस्मानाबाद विभागातील आगारातून मागणीनुसार /आवश्यकतेनुसार उमेदवारांना बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविलेआहेत.