उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयातील हजारो शेतकरी गेल्या काही महिन्यापासून पीक कर्ज मिळाले नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक शेतक­यांनी जिल्हयातील विविध राष्ट्रीयीकृत बँकेत आपली पीक कर्ज प्रकरणे दाखल केलेली आहेत. पण अद्यापपर्यंत सुध्दा अनेक शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्यामुळे पिक कर्जाचे तात्काळ वितरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मार्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी आज सोमवारी (दि.28) रोजी जिल्हाधिकारी व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन देऊन केली आहे.

 श्री कोळगे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री निलेश विजयकर यांची भेट घेऊन पिक कर्जाच्या प्रलंबीत फाईली संदर्भात चर्चा केली यावेळी उभयतांनी सकारात्मक चर्चा करुन शेतक­यांच्या पिक कर्जाच्या फाईली मंजुर करण्याबाबत संबंधितांना आदेशीत केले. यावेळी श्री कोळगे यांनी  गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या कोवीड-19 साथीमुळे उद्भवलेल्या परीस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनतेसह शेतक­यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. खरीपाची पेरणी दुबार करावी लागली तर सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ऊस पीकासह सोयाबीन,उडीद,मुग,कापुस पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परीस्थितीत शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना पर्याय म्हणून पीक कर्जाकडे पाहतो. जिल्हयातील शेतक­यांनी पदर मोड करुन पीक कर्जाच्या फाईली विविध बँकामध्ये दाखल केल्या आहेत परंतू बँक अधिका­याच्या धोरणामुळे गेली दोन चार महिन्यापासून पीक कर्ज फाईली धुळखात पडल्या असल्याच्या सांगितले. तरी जिल्हयातील राष्ट्रीयीकृत बँकेचा आढावा घेऊन त्यांना सूचना करुन वंचित शेतक­यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. अशी मागणी यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तसेच जोपर्यंत जिल्हयातील शेतक­यांना पिक कर्ज मिळत नाही तोपर्यंत प्रशासनाकडे आपला पाठपुरावा चालुच राहणार असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मार्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी म्हटले आहे.


 
Top