उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील औराद शिवारात शेतात अतिक्रमण करणाऱ्या भावकीतील दोघांविरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. धन्नू मोतीराम राठोड यांच्या शेतात दि.२६ मे रोजी गोविंद व पांडुरंग विठ्ठल राठोड या दोघा भावांनी कडबा, सरपन आणून टाकले. ते साहित्य काढून घेण्यास धन्नु राठोड यांनी त्यांना वेळोवेळी विनवण्या केल्या. यावर त्यांनी धन्नु यांना शिवीगाळ करुन “हे शेत आमच्या मालकीचे असुन साहित्य काढणार नाही’ असे धमकावले. याप्रकरणी वरील दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

 
Top