उस्मानाबाद / प्रतिनिधी-
वाशी येथील घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
वाशी येथील पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये घरफोडी झाली होती. यामधील आरोपी सुभाष शिवा शिंदे (रा. पारधी पेढी, इंदिरानगर, पारा, ता. वाशी) फरार होता. हा पोलिसांना तपासकामी हवा होता. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, सहाय्यक पोलिस फौजदार मधुकर घायाळ, हवालदार तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोलिस नाईक समाधान वाघमारे यांच्या पथकाने त्याला पकडले. त्याला पुढील तपासासाठी वाशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
 
Top