उस्मानाबाद / प्रतिनिधी-
हवामानात सातत्याने होणारे बदल व हवामानाचा अंदाज या विषयी आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहिती मिळावी व त्या अनुशंगाने पीक नियोजन करून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भारतीय हवामान विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प राबवला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे जिल्हा कृषी हवामान योजना कार्यान्वित केली आहे. या योजने अंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका बनवली जाते. या पत्रिकेमध्ये पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज व हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो. शेतीतील दैनंदिन कामे करताना हा हवामान आधारीत कृषी सल्ला शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा तालुकानिहाय हवामान अंदाज व त्यावर आधारित कृषी सल्ला आपल्या मोबाइलवर मिळवण्याकरिता https://docs.google.com/forms/d/e/ या लिंकवर नोंदणी करून घ्यावी तसेच लिंकवर जोडण्यासाठी काही अडचणी असल्यास ९९६०१०२३९६ या क्रमांकावर संपर्क साधून ही लिंक आपल्या मोबाइलवर मागवून घ्यावी जेणेकरून त्यांना आपल्या व्हॉट्सअॅपवर तालुकास्तरीय सविस्तर हवामान अंदाज व कृषी सल्ला पत्रिका मिळेल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. नकुल हरवाडीकर यांनी दिली.