उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारणीची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी अयाज (बबलू) शेख यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सदरील नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी अामदार राहुल मोटे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस मसूद शेख, धनेश्वरी शिक्षण समुहाचे प्रतापसिंह पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शेख व सचिन तावडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, अमर चोपदार, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष अमित शिंदे, जिप सदस्य महेंद्र धुरगुडे, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, नगरसेवक प्रदीप घोणे, बाबा मुजावर, मनोज मुदगल, संग्राम बनसोडे,अमोल उर्फ मुन्ना सुरवसे, अशोक सोन्ने पाटील, नागेश निर्मळ, सौरभ देशमुख, लतिफभाई शेख, भागवत भांडारकर, प्रमोद वीर, रणवीर इंगळे, सुहास मेटे, चंदन जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे नूतन शहराध्यक्ष अयाज शेख व कार्याध्यक्ष सचिन तावडे यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

 
Top