तुळजापूर / प्रतिनिधी-
रोटरी क्लब चा  पदग्रहण समारंभ कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने सोशल डिस्टंन्स पाळुन मंगळवार दि 11 रोजी गोपाळ नगर येथील रोटरी हॉल मध्ये  रो विष्णू मोढे या प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत पार पडला.
प्रथमता  नूतन अध्यक्षा अॅड.स्वाती नळेगावकर यांनी मावळते अध्यक्ष रो सचिन शिंदे यांचे कडून पदभार स्वीकारला.नंतर टीम  बोर्ड ऑफ डायरेक्टर्स  ची ओळख करून त्यांना पुष्प देऊन सन्मानित केले  पदभार घेतल्यानंतर तातडीने काम करण्यास आरंभ घेतल्याचे सांगुन  व आजपर्यत १७० वृक्ष रोपणकरुन संगोपन सुरु केल्याचे यावेळी सांगितले  केले. शिक्षकासाठी  नवीन तंत्रज्ञानाशी  ओळख मैत्री आणि मोबाईल वरून विद्यार्थ्यांना कसे शिकवत येईल त्यास उपयुक्त असलेला शिक्षकांन साठी सात  दिवसांचा  आयटी  स्किल  प्रोग्राम घेतला ह्याचा फायदा जवळजवळ 800 ते 900 जणांनी घेतल्याचे यावेळी संंगितले.
चालू वर्षात जेष्ठ व्यक्ती साठी मोफत मोतीबिंदू शिबिर, शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती साठी तज्ज्ञ कडून मार्गदर्शन शिबीर, ब्लड डोनेशन कॅम्प, महिला सक्षमीकरण कारणसाठी शिलाई मशीन वाटप व शिवण काम प्रशिक्षण शिबीर,युवकान साठी Mpsc UPSC चे मार्गदर्शन पर शिबिर, युवकांन साठी मोफत कायदेविषयक शिबिर,शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स ची सोय उपलब्ध करून देणे आणि त्याच बरोबर dispose मशीन देणे असे समाजास उपयुक्त कार्यक्रम त्यांच्या टीम सोबत राबवण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले
यावेळी    प्रमुख पाहुणे म्हणून  पीडीजी रो विष्णू मोंढे वमनीषा मोंढे यांनी  मार्गदर्शन केले , या प्रसंगी यावर्षी चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स  सर्व रोटरीयन्स उपस्थित होते या वेळी नवीन मेंबर्सना आमंत्रित करून त्यांचे स्वागत करण्यात आले... रोटरीयन्स ची दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यांना भेट वस्तू  देऊन सत्कार करण्यात आला.तसेच  तीस वर्षे पेक्षा जास्त आणि सतत रोटरी मध्ये ऍक्टिव्ह असलेले चार्टर मेंबर रो.आप्पासाहेब पाटील, रो.कुंदन कोंडो या रोटरीयन्सचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.
 यावेळी नूतन अध्यक्षा स्वाती नळेगावकर यांचेबरोबर एकजुटीने काम करण्याच्या निश्चयाने  रो निर्मला जाधव यांनी  नूतन सचिव या पदाची जबाबदारी स्वीकारली. या प्रसंगी प्रत्येकाने सोशल डिस्टन्स, हँडग्लोव्हज, मास्क व  सॅनिटीझर याचा वापर करून  कॉविड -19 चे नियम पाळून करण्यात आला

 
Top