उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांतर्फे पत्र पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून पाच लाख शेतकऱ्यांकडून ही पत्रे पाठविली जाणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, राज्यातल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा महायुतीच्या वतीेने महादूध एल्गार आंदोलन १ आॅगस्ट रोजी संपूर्ण राज्यात करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान देऊन त्यांचा प्रश्न सोडवला होता. परंतु महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आजपर्यत कोणताही न्याय दिलेला नाही. यामुळे भाजपाचे प्रदेश सटचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे दूध आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय भाजपा महायुतीने घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रातील ५ लाख दूध उत्पादक शेतकरी पत्ररूपी निवेदन पाठवणार असून जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी हजारोंच्या संख्येने मुख्यमंत्री यांना निवेदने पाठवणार आहेत. अनुदान मिळवून देण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन १३ ते १९ आॅगस्ट या दरम्यान करण्याचे ठरविले आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पत्रामध्ये गाईच्या दुधाला ३० रूपये दुधाला प्रतिलिटर दर व १० रुपये अनुदान तसेच दुध भुकटीला ५० रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी करावी.