उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
गोर-गरीब कुटुंबाना गंभीर आजार झाल्यानंतर त्यांना योग्य उपचार घेता यावेत याकरीता शासनाच्या वतीने महात्मा फले जन आरोग्य योजना कार्यान्वीत केली आहे.  या योजनेत शासनाने कोरोना आजाराचाही समावेश केला आहे. उस्मानाबाद शहरातील सुविधा रुग्णालय, सह्याद्रीरुग्णालय, निरामय रुग्णालय, पल्स रुग्णालय या फक्त चार खाजगी रुग्णालयामध्ये कोवीड-१९ च्या रुग्णावर उपचार
होत आहे. मात्र खाजगी रुग्णालयाने या योजने अंतर्गत उपचार परवडत नसल्याचे कारण सांगून उपचार देत नाहीत.
आर्थिक स्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्या व्यक्तीवर उपचार व्हावे या करीता राज्य शासनाच्या वरतीने सन २०१३ सालापासून महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली आहे.  तरी देखील खाजगी रुग्णालय योजने अंतर्गत नागरिकांना उपचार दिले जात नाहीत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कार्यवाही करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभागाने सर्व शहरातील खाजगी रुग्णालयाला वारंवार नोटीसा देवून देखील रुग्णालय सदर नोटीसीला केराची टोपली दाखवत आहेत. सुविधा रुग्णालय येथे कोवीड-१९ चे पेशंट घेतले जात नाहीत. या रुग्णालयवर कडक ते कडक कार्यवाही करुन यांचा परवाना रद्द करण्यात करावा, उस्मानाबाद शहरातील १७ रुग्णालय  या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र यातील काही रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार होत आहेत तर अन्य रुग्णालय नॉन कोवीडसाठी सुरु आहेत.  तरी या  १७ रुग्णालयात महात्मा फूले जन आरोग्य योजना लागू करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने कायदा पारित करुन महाराष्ट्रातील सर्व खाजगी रुग्णालय कोवीड-१९ साठी ताब्यात घेतले आहेत असे सांगत आहेत. मात्र वेगळीच परिस्थिती असून प्रशासनाचेही खाजगी रुग्णालय ऐकत नसल्याचे दिसून येते. तरी गोर-गरीब गरजूंना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ मिळावा, चांगल्या खाजगी
रुग्णालयमध्ये सुख-सुविधा व चांगला उपचार मिळाला तर अनेक गोर-गरीब जनतेचे प्राण वाचतील, लवकरात लवकर या रुग्णालयवर कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच शहर सचिव दादा कांबळे यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी, सरपंच, मुरली देशमुख, शहर अध्यक्ष, संजय पवार,ग्रामपंचात सदस्य चंद्रकांत,शेटे, तालुका उपाध्यक्ष,सलीम औटी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष, सौरभ देशमुख,धिरज खोत अदी उपस्थित होते..

 
Top