उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ महिन्यांपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद असल्याने कोट्यवधी भाविक अस्वस्थ असून, नियम व अटी घालून सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे १ सप्टेंबरपासून उघडण्यास परवानगी द्यावी, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व धर्मीय नागरिकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या घराजवळ असलेल्या प्रार्थनास्थळाजवळ घंटानाद किंवा इतर प्रतिकात्मक कृती करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लॉकडाऊन लागू करताना देशातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने ८ जूनपासून अटी शर्तींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिली होती. याला अनुसरून अनेक राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत. यानुषंगाने आ.पाटील यांनी २२ जून रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १ जुलैपासून तुळजाभवानी मंदिरासह राज्यातील सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत मागणी केली होती.